Now Loading

महावितरणकडून सुरु असलेली प्रत्येक कृषि पंप ८ हजार विद्युत बील वसुली ऐवजी ५ हजार व्हावी काँग्रेस पक्षाचे आष्टी पाटोदा शिरुर विधासभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे यांची खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी आष्टी ( रिपोर्टर ):- महावितरणकडून शेतक-यांच्या कृषि पंपाची प्रत्येकी ८ रुपये वीज बील वसुली ऐवजी ५ हजार रुपये वसुली वीज बील वसुल करण्यात येवुन विजपुरवठा सुरुळीत सुरु करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे आष्टी पाटोदा शिरुर विधासभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे यांनी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे, सध्या महावितरणाकडून शेतक-यांकडील थकीत विज बील वसुली सुरु आहे. त्यामुळे अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे. विज पुरवठा खंडीत केल्याने अनेक शेतक-यांचे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी अर्थिक संकटात आहे. महावितरणाकडून सुरु असलेली शेतक-यांकडील थकीत विज बील वसुली प्रत्येकी कृषि पंप आठ हजार ऐवजी पाच हजार करावी असी मागणी रवि काका ढोबळे यांनी खा.रजनीताई पाटील यांच्याकडे बीड येथे केली आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. या निवेदनावार रविंद्र ढोबळे, काकासाहेब कर्डीले, विश्वनाथ नाथ, अजिनाथ महाडीक, बंडु जायभाये इत्यादींच्या सहया आहेत.