Now Loading

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन - डॉ. राहुल टेकाडे आष्टी ( रिपोर्टर ):- आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आले असून गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे यांनी केले आहे. आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये दि.२३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बिनटाका शस्त्रक्रिया कॅम्प बाबत तालुक्यातील सर्वं वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांना कळवण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे बिनटाका शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदरील कॅम्पमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.सुरेश साबळे स्वतः शस्त्रक्रिया करणार आहेत.तरी सर्व कर्मचारी यांनी आपापल्या विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांना याबाबत याची माहिती द्यावी व सदरील कॅम्पचा लाभ घेण्यास प्रवृत्त करावे तसेच सोमवारी या साठी लागणाऱ्या तपासण्या लाभार्थींनी ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन पूर्ण करून घेतल्यानंतर मंगळवारी बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.गरजू महिलांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. राहुल टेकाडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आष्टी यांनी केले आहे.