Now Loading

संभाजी ब्रिगेडच्या आढावा बैठकीत समुद्रपूर तालुका कार्यकारणीची निवड

वर्धा: दि. २० नोव्हेंबरला तालुका समुद्रपूर येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक पार पडली या बैठकीत या संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिना विषयी चर्चा करण्यात आली व आगामी काळातील येणाऱ्या नगर परिषद, नगरपंचायत , जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक विषयी नियोजन करण्यात आले. तसेच तालुक्यात नवीन कार्यकारणीची करण्याची निवड करण्यात आली अभिजीत पाल याची जिल्हा संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली. श्रावण महाजन यांची जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली किशोर भोयर यांची हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली समुद्रपूर तालुका अध्यक्ष गजानन चापले यांची निवड करण्यात आली तालुका सचिव पदी चेतन हिवरकर, अभिजीत पोटफोडे समुद्रपूर तालुका संघटक पदी निवड करण्यात आली , प्रतिक धानोरकर याची समुद्रपूर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश धोटे , उपाध्यक्ष अशोक वेले , जिल्हा कार्याध्यक्ष तुषार थुटे यांनी नवयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देवून. सन्मानित केले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश धोटे यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.