Now Loading

कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचविण्यासाठी वयोवृद्ध आजीचे आंदोलन

कल्याण पश्चिमेकडे कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून निष्कासन करण्याचा घाट घातला आहे. प्रशासनाच्या या षडयंत्राविरोधात लक्ष्मीबाई मारुती ससाणे या 85 वर्षीय आजीबाईंनी आंदोलन सुरू केले आहे. सदर पुतळा, स्मारक आणि तेथिल उद्यान वाचण्यासाठी या आजीबाईंनी शुक्रवारपासून आमरण उपोषणाचे मार्ग अवलंबला आहे.       शुक्रवारी सकाळी या आजीबाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आमरण उपोषणासाठी बसले आहेत. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला आहे. मात्र दुपारपर्यंत या आजीबाईंजवळ प्रशासनातर्फे कुणीही व्यक्ती फिरकला नाही. सदर उद्यानाची जागा आजपर्यंत दोन वेळा तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा स्मार्टसिटी अंतर्गत पुन्हा ही उद्यानची जागा प्रशासन घेऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचवण्यासाठी या 85 वर्षाच्या आजीबाईंच्या पाठी आपण खंबीरपणे उभे राहू समर्थन देताना विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना पाठींबा देताना समोर येत आहेत.त्याचप्रमाणे आयुक्त बंगल्याची भिंत बाधित होत असताना डीपी रस्ता थोडा नागमोडी करण्यात आला. अगदी त्याचप्रमाणे काही वेगळा पर्याय करवून विकास पण झाला पाहिजे आणि उद्यानही बाधित व्हायला नकोय, ही आजीबाईंनी मागणी आहे. अशी काही पर्यायी व्यवस्था केडीएमसीने करण्याची वेळ आली आहे. नाही तर उद्यानाचे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.