Now Loading

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मुंबई मध्ये शनिवारी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात "नवभारत गव्हर्नंस" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापुरात पदभार घेतल्यापासून जिल्हा प्रशासनाचा कारभार अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोना सारख्या महामारीच्या दोन लाटेला यशस्वीपणे तोंड देत सोलापूर जिल्ह्याला त्यांनी प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे बाहेर काढले. एकूणच त्यांच्या या कार्याची दखल घेत देशातील नवभारत या माध्यम समूहाने त्यांचा "नवभारत गव्हर्नन्स 2021" या पुरस्काराने सन्मान केला. याच सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अलोक कंसल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मनीषा म्हैसकर, बिपिन श्रीमाळी, दिनेश वाघमारे, राधेश्याम मोपलवार, संजय मुखर्जी, ब्रजेश दीक्षित, सुरेश काकानी, बी. राधाकृष्णन, अनिल कवडे, अश्यतिक कुमार, भाग्यश्री बानायत, महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.