Now Loading

पुरुषांनी संघटीत होणे काळाची गरज - अ‍ॅड बोरसे

धुळे महिला सक्षमीकरण योजनांप्रमाणे पुरूष सक्षमीकरणासाठी देखील शासनस्तरावरून विविध योजनांची आखणी होऊन अंमलबजावणी व्हावी.समाजात पुरूष आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, पुरूषांना आत्महत्या का? कराव्या लागत आहेत,त्यामागची कारणे कोणती? त्यासाठी समाजात प्रबोधन होऊन पुरूष आत्महत्यांचे सत्र थांबले पाहिजे.शासनस्तरावर पुरूष हिताचे निर्णय घेतले पाहिजेत.त्यासाठी पुरूषांनी संकुचित वृत्ती सोडून विशाल दृष्टिकोन बाळगून एकत्र आले पाहिजे.आपल्या न्याय हक्कासाठी लढा देताना जागतिक पुरूष दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन जिव्हाळा पुरूष हक्क समितीचे मुख्य संचालक अ‍ॅड.विनोद बोरसे यांनी केले.जागतिक पुरूष दिनाच्या निमित्ताने जिव्हाळा अ‍ॅडव्होकेट अ‍ॅकेडमी व जिव्हाळा पुरूष हक्क समितीचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकत्र्या सरोज कदम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक प्रविण कदम, पोलिस निरीक्षक सुनील बोरकुटे, डॉ सुरेश बिहाडे,महिला स्मिता खैरनार,नाजनिन शेख,सुरेखा नांद्रे,मंगला मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा अ‍ॅडव्होकेट अ‍ॅकेडमीचे अ‍ॅड.अबरार सैय्यद यांनी केले.यावेळी पो.नि.प्रविण कदम,पो.नि.सुनिल बोरकुटे यांनी मार्गदर्शन केले तर सरोजकदम,सुरेखा नांद्रे,नाजनिन शेखयांनी आपल्या मनोगतातुन उपस्थित पुरूषांना जागतिक पुरूष दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व महिलांना सोबत घेऊन कार्यक्रम होत असल्याने समाधान व्यक्त केले.धुळे महिला सुरक्षा मंचच्या अध्यक्षा नाजनिन शेख यांनी आणलेला केक कापून पुरूष दिन साजरा करण्यात आला.तसेच यशवंत ग्राहक मंचाचे मंगला मोरे यांनी जिव्हाळा पुरूष हक्क समितीचे मुख्य संचालक अ‍ॅड.विनोद बोरसे यांना प्रातिनिधीक स्वरुपात पुष्पगुच्छ देऊन पुरूष दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुका उपाध्यक्ष रणजित शिंदे यांनी चळवळीचे गीत सादर केले.धाराऊ वृक्ष संवर्धन समितीचे सुरेखा नांद्रे यांनी जागतिक पुरूष दिनाच्या निमित्ताने पाच वृक्ष लागवड करणेचीघोषणाकेली.कार्यक्रमालाअ‍ॅड.तरूणापाटील,अ‍ॅड.भाग्यश्रीअहिरे,अ‍ॅड.अबरार सैय्यद,अ‍ॅड.भुषणभामरे,सुषमा महाले , प्राचार्यडॉ.दीपक बाविस्कर, श्रीकृष्णबेडसे,जॉनी पवार ,छोटुलाल मोरेआदी उपस्थित होते.