Now Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाम चौरस्ता येथे श्री .शरदचंद्र पवार यांचे जंगी स्वागत

विदर्भातील दौऱ्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार चंद्रपूर येथून दौरा आटोपून नागपूर कडे जात असताना जाम चौरस्ता येथे दि.२० नोव्हेंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी हिंगणघाट मतदार संघाच्या वतीने ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजी सह फुलाचा वर्षाव करत "शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशी नारे देत जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांना खासदार पवार यांच्या आटोपतत्या दौऱ्याची माहिती मिळताच तिमांडे यांनी जाम चौरस्ता येथे स्वागताची जंगी तयारी केली होती. त्यावेळी खासदार शरद पवार यांचा ताफा जाम चौरसत्यावरून जात असताना माजी आमदार प्रा. राजू तिमांडे कार्यकर्त्यांसह दिसताच पवार यांनी गाडी चालक यांना इशारा देत गाड्यांचा ताफा थांबवला व त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांचे औक्षवंत केले व त्यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.