Now Loading

कान्हेगाव येथील गोठयास आग शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान.

परभणी दि.21; पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठयास आग लागून गोठा जागीच भस्मात झाला असून संबंधित शेतकऱ्याचं लाखों रुपयाचं नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की कान्हेगाव येथील शेतकरी केशव डोमाजी पार टकर यांच्या शेतांत शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जनावरांच्या गोठयास अचानक आग लागली, या आगीत शेती उपयोगी साहित्य जळाले असून अन्य मालमतेच मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.