Now Loading

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचवण्यासाठी आजीच्या आंदोलनाला पाठिंबा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्यासाठी आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यामार्फत तीनवेळा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तीनवेळा उद्यानाची जागा ताब्यात घेण्यात आली .दोनदा मुरबाड रोड साठी आणि एकदा रुक्मिणीबाई हॉस्पिटलकरीता . . . यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी घेतलेली जागा आजपर्यंत पुन्हा दिलेली नाही त्या बदल्यात जागा वाढवून देण्याचे वेळोवेळी खोटे आश्वासन दिले आहे , आजपर्यंत आश्वासन पाळले गेले नाही . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही एक ऐतिहासिक जागा आहे महानगरपालिका स्मार्ट सिटी च्या नावाने मोठमोठे उदयाने नष्ट करीत आहे . लक्ष्मीबाई मारुती ससाणे या ८५ वर्षांच्या आमरण उपोषणाला कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे पाठिंबा दिला यावेळी उपाध्यक्षा अॅड. माया गायकवाड , अॅड प्रकाश जगताप , सदस्य मनीषा धिवरे आदरणीय के.डी.तायडे , अॅड. कैलास जाधव , अॅड. डी .बी वानखेडे आदी वकील उपस्थित होते