Now Loading

सोलापूर ! मार्केट यार्डात कांदा व्यापाऱ्याला भागीदाराने 10 लाखाला गंडवले

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा व्यापाऱ्याला त्याच्या भागीदाराने 10 लाख 40 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिलाणी उस्मान जमादार, वय ४५ वर्षे, राहणार बोरेगाव, तालुका अक्कलकोट,असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे तर राकेशकुमार जयकुमार माणिकशेट्टी, वय ३८ वर्षे, व्यवसाय व्यापार, राहणार कामाक्षी नगर,शेळगी हे फिर्यादी आहेत . फिर्यादी व आरोपीत असे मिळुन कांदयाच्या शिझनच्या कामास सुरुवात केली होती. आरोपी हा फिर्यादी यांच्या दुकानी कांदा आवक करून घेणे, शेतकन्याकडुन आलेल्या कांद्याचा लिलाव करणे व मार्केट मधील फिर्यादीच्या दुकानाचा कांदा घेणाऱ्या व्यापाराचे कलम (रक्कम) जमा करणे इ. कामे कमिशनवर आरोपी हा फिर्यादीच्या दुकानी करीत होता. त्यामुळे व्यापारी माणिकशेट्टी यांचा विश्वास बसला दरम्यान आर्थीक फसवणुक करण्याच्या इरादयाने फिर्यादीकडुन हात उसने म्हणून १,००,००० रुपये, शेतकऱ्यांना उच्चल म्हणून २ ७०,६५० रुपये व फिर्यादीचे श्री सिध्देश्वर मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्याकडून येणे असलेले कलमे (रक्कम) ८ २३ ५४८ रुपये भाडयापोटी म्हणून घेतलेले रक्कमेपैकी १,८०,८७० रुपये शेतकरी बारदण्यासाठी उचल २१,९०४ रुपये, व्यापारी कलम ( रक्कम) कमी आणणे २६,४४१ रुपये उत्पन्न वजा खर्च ४३,२२८ रुपये शेतकऱ्यांच्या पट्टीतील वाढ करून केलेली फसवणुक रक्कम २३.९४८ रु असे एकुण १४,९०,५८९ रुपयांची अफरातफर केली आहे. त्यापैकी फक्त ४,५०,००० रुपये परत केले असुन त्यास उर्वरीत १०,४०,५८९ रुपये वारंवार मागणी केली असता त्याने फिर्यादीस ४,५०,००० रुपये तु दिलेला तक्रारी अर्ज मागे घेण्याकरीता पैसे दिलो होतो. आता उर्वरीत १०,४०,५८९ रुपये देणार नाही तुला काय करायचे आहे ते कर. तुला कुठ जायचे आहे तेथे जा या पुढे माझ्याकडे आला तर खल्लास करून टाकेण अशी दमदाटी केला आहे व हेतुपुर्वक उर्वरीत १०,४०,५८९ रु फिर्यादीस परत न करता फिर्यादीची फसवणुक करुन दमदाटी केला आहे.