Now Loading

वर्धा काँग्रेस कमिटी तर्फे 20 /11/ 2021 हा दिवस किसान विजय दिवस म्हणून साजरा.

वर्धा: अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारने जे शेतकरी विरोधी काळे तिन कायदे काल रद्द करण्यात आले म्हणून काल जी घोषणा झाली. शेतकर्या च्या विजया बद्ल अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटीने दि. २०/ ११/ २०२१ रोजी हा दिवस " किसान विजय दिवस " म्हनुन साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्या अन्तर्गत वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी व सर्व फ्रँटल सेल, विभाग च्या वतिने सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वर्धा जिल्हाचे प्रभारी झिया पटेल यांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या विरोधात नारे/घोषणा देण्यात आल्या व शेतकरी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. आणि त्याच मार्गावरून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे क्यान्ड़ल मार्च मार्गस्थ करण्यात आला केंद्र सरकार हाय, मोदी, शाह मुर्दाबाद चे नारे देण्यात आले. " आरे नही चलेगी, नही चलेगी तान्हाशाही नही चलेगी. " " केंद्र सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय " अशी नारे आणि घोषणा देण्यात आल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला झिया पटेल जिल्हा प्रभारी , श्री. मनोजभाऊ चांदुरकर जिल्हा अध्यक्ष वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी, डॉ. शिरीषजी गोडे,. आशोकभाऊ शिंदे माजी मंत्री यानी, श्री. चंद्रकांत काकडे प्रदेश सचिव यांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले.