Now Loading

साहसीक जनशक्ती संघटना सेलू नगर पंचायत, वर्धा नगर परिषद, सिन्दी व कुषी उत्पन बाजार समिती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका स्वबळावर लढणार

सेलू येथे जनशक्ती संघटनेची सभा संस्थापक अध्यक्ष रवींद्रभाऊ कोंटबकार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये सेलू नगरपंचायत ते प्रभाग निहाय १७ हि उमेदवाराची अंतिम यादी तयार करण्यात आली असून, वर्धा नगर परिषद निवडणूक, सिंदी व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर साहसिक जनशक्ती संघटना सेलू व वर्धा या दोन्ही बाजार समितीच्या ग्रामपंचायत गट, सोसायटी गट, हमाल मापारी गट, अडते व्यापारी गटाच्या सर्व जागा लढविणार असे सर्वानुमते ठरले . तसेच वर्धा नगर परिषदेच्या ३९ जागा लढविणार व त्यासाठी उमेदवार सुद्धा प्रत्येक प्रभागात आरक्षणानुसार निश्चित केले जाईल, तसेच वर्धा जिल्हा परिषद सोबतच सेलू व वर्धा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा संघटना लढविणार असल्याने व काही उमेदवार जवळजवळ निश्चित असल्याने त्यांनी कामाला लागावे असे मार्गदर्शन करण्यात आले. सेलू बाजार समितीची निवडणूक व सेलू तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छुक उमेदवारांनी साहसीक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवीद्रभाऊ कोंटबकार (पाटील) व संपर्क प्रमुख गणेशराव खोपडे , तालुका युवा अध्यक्ष सागरजी राऊत, अन्सारभाई शेख , राजूजी झाडे, श्यामसुंदरजी बोबडे, बालूजी डेकाटे, पांडे महाराज यांच्याशी संपर्क साधावा तसेच वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती , वर्धा नगर परिषद व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढविण्यास इच्छुकांनी साहसीक कार्यालय वर्धा,तसेच मकरनजी पाठक , महेशजी ठाकूर, अनुपजी जयस्वाल , बाजीरावजी हिवरे, पवनजी कुक्रेजा , शक्तीं नाडे, रमेशजी मोगरे, इम्रान भाई , निरजजी त्रिपाठी, विल्सन मोखाडे , रसुल भाई यांच्याशी संपर्क साधावा , या सर्व निवडणुका येत्या चार महिन्यात होणार असल्याने संघटनेच्या सर्व संभाव्य उमेदवारांनी कामाला लागावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या , यावेळी संघटनेचे ज्येष्ठ महिला , युवा पदाधिकारी संभाव्य नगर पंचायत बाजार समिती , नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.