Now Loading

सोलापुरात बबनराव घोलप यांच्या अंगावर शाई फेकली ; आ. प्रणिती शिंदेंसमोर घडला प्रकार ; नगरसेविका फुलारे जमावाला भिडल्या

सोलापूर : चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर एका तरुणाने रविवारी सोलापुरातील समाज मेळाव्यात शाई फेकली. मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेमधील संचालक अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार चर्मकार समाजातील प्रमुख तथा आश्रम शाळेमधील संचालक मयत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता. त्याचा राग मनात धरून अशोक लाबतुरे आणि त्यांच्या पत्नी हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे कुटुंबीयांना विश्वासात घेत न्याय देतो अशी ग्वाही देऊन अशोक लाबतुरे आणि त्यांच्या पत्नी यांना संघटनेतून काढून टाकले होते. जोपर्यंत शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना संघटनेत घेणार नाही असा शब्द दिला होता. तो शब्द खोटा ठरवत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबाला फसवून त्यांना संघटनेत पुन्हा घेऊन सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांना मयत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला तर त्यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी स्टेजवर त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या नावे जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी बबनराव घोलप यांची बाजू घेत जमावाला भिडल्याचं दिसून आल. आमदार प्रणिती शिंदे यांनी ही मध्यस्थी करत जमावाला शांत केले नेमके काय घडले त्याठिकाणी ते पहा