Now Loading

जिल्ह्यात पत्रकार व कुटूंबियांसाठी मोफत आरोग्य शिबीर तज्ञ डॉक्टांकडून होणार तपासणी नावनोंदणीचे आवाहन्

धुळे ह धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील व धुळे शहरातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धुळे शहरातील श्री. छत्रपती हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. तरी पत्रकार बांधवांनी आरोग्य शिबिरापूर्वी नाव नोंदणी करावी. असे आवाहन धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी असलेली माृतसंस्था अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त हे शिबिर घेण्यात येत आहे. पत्रकारिता करीत असतांना अनेकवेळा पत्रकारांकडून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याकडे वेळेअभावी दुर्लक्ष होत असते. त्यामुळे त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते, अशावेळी त्यांच्यावर प्रचंड आर्थिक भारही पडत असतो. त्यापाश्र्वभूमीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांची आरोग्यविषयक काळजी घेणारा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. धुळे तालुका मराठी पत्रकार संघ आणि धुळे शहरातील नकाणे रोडवरील श्री छत्रपती हॉस्पिटल, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी श्री छत्रपती हॉस्पिटल नकाणे रोड धुळे येथे सकाळी १० वा. शिबिराला सुरुवात होणार आहे. शिबिरामध्ये मेंदू विकार तज्ञ डॉ.विजय कुमार, अस्थिरोग तज्ञ, डॉ.अमोल खैरनार, पोटाचे विकार तज्ञ डॉ. निशिगंध पाटील, जनरल मेडिसिन डॉ. भूपेश पाटील, नाक कान घसा तज्ञ डॉ. हिमांशू विजयकुमार, बालरोगतज्ञ डॉ. दादाभाई पाटील, स्री रोग तज्ञ डॉ. शीतल पाटील या वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात तज्ञ डॉक्टरांच्यामार्फत मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. आरोग्य शिबिरामध्ये सीबीसी, ब्लड ग्रुप, बीएसएल(शुगर तपासणी), इसीजी या प्राथमिक स्वरूपातील रक्त चाचण्याही मोफत केल्या जाणार आहेत. दरम्यान एक्स-रे, सिटी स्कॅन आणि शिबिरांर्थींसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात केली जाणार आहे. गरज पडल्यास शिबिरानंतर उपचार, शस्त्रक्रिया व निदानासाठी सवलत देण्यात येणार आहे. मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शिबिरार्थींना नाव नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके,(मोबाईल क्र.९७६५२०१८७७),उपाध्यक्ष आरिफ पठाण (मोबा. क्र९४२२५८३७५०), सचिव रामकृष्ण पाटील (मोबा. क्र.८२०८८६२९०३), सहसचिव उमाकांत पाटील (मोबा. क्र८२७५३५४३७०), खजिनदार चुडामण पाटील (मोबा. क्र.९६५७११७७०१), रणजित fशंदे (मोबा. क्र८२७५५९०५२४) यांच्याकडे संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी व धुळे,नंदुरबार जिल्हा आणि धुळे शहरातील पत्रकार बांधवांनी स्वतः व आपल्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके, उपाध्यक्ष आरिफ पठाण, सचिव रामकृष्ण पाटील, सहसचिव उमाकांत पाटील, खजिनदार चुडामण पाटील आणि पदाधिकाNयांनी केले आहे. शिबिरातील वैशिष्ट्य म्हणजे आजारी रुग्णांबरोबरच आजार होऊ नयेत म्हणून याची पूर्व काळजी म्हणून मोफत पुर्वतपासणीही पत्रकार व त्यांच्या