Now Loading

मातोश्री महिला कॉलेज हिंगणघाट येथे रक्तदान शिबिर संपन्न

वर्धा: मातोश्री कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दिनांक २१/११/२०२१ रोज रविवारला विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट चे सचिव व मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट चे प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, शिबिराला उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट चे अध्यक्ष पांडुरंगजी तुळसकर, डॉ निलेश तुळसकर, डॉ रमेश बोभाटे, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर चे प्राचार्य मेघश्याम ढाकरे, डॉ राजविलास कारमोरे, डॉ नयना शिरभाते, जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर चे डॉ अनिल निमपल्लिवर, डॉ सरोज पौनिकर, प्राचार्य नितेश रोडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर उपस्थित होते प्रसंगी फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले व प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून सर्वांनी शुभेछ्या दिल्यात, रक्तदान शिबिर मधे उपस्थीत सर्व विद्यार्थिनी व उपस्थितांच्या रक्तदान बद्दल असलेल्या शंका दूर करण्यात आल्या, सदर शिबिरात एकूण ३२ रक्तदात्यानी रक्तदान केले, सर्व रक्तदान करणाऱ्यांसाठी महाविद्यालयाकडून नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली व सर्वांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा सपना जयस्वाल, प्रा मोनाली गिरडे, प्रा वैशाली तडस प्रा अजय बिरे, अमित रेंढे, किरण फुलमाळी व कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेविका यांनी सहकार्य केले जन्मदिनी रक्तदान शिबिर आयोजित करून ते यशस्वी पार पाडल्याबद्दल डॉ उमेश तुळसकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेत