Now Loading

वर्धा शहरात विविध ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ११ शाखेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन

दिनांक 20नोव्हेंबर ला वर्धा शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरात ११ शाखेचे व जनता युवा मोर्चाच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉ. पंकज भोयर च्या हस्ते करण्यात आले आहे. सदर उद्घाटनाला भाजप जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध प्रभागात मतदारात नोंदनी करण्यात येणार आहे. सदर अभियानाचा लाभ शहरातील मतदारांनी घ्यावा असे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मोहित उमाटे यांनी केले