Now Loading

डोंबीवली पाथरली  गॅस शवदाहिनीत भडका उडाल्याने कर्मचारी जखमी उपचारासाठी कर्मचार्याची होरपळ तासभर रुग्णवाहिका नाही ,पालिकेच्या रुग्णालयात तज्ञ डॉकटर नाही ....

कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नसल्याने अनेकदा रुग्णांची ससेहोलपट होताना दिसून येते . असंच एक प्रकरण काल रात्रीच्या सुमारास समोर आलं आहे .डोंबिवली पाथरली मधील स्मशान भूमीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेचा अत्यंसंस्कारा दरम्यान गॅस शवदाहिनाचा भडका उडाला. या घटनेत स्मशानभूमीत काम करणारया कंत्राटी कर्मचाऱ्याचा चेहरा भाजला. नागरिकांनी तत्काळ पालिका रुग्णलयात रुग्णवाहिकेसाठी फोन केला मात्र तासभर उलटूनही रुग्णवाहिका आली नाही ,अखेर या नागरिकांनी जखमी कर्मचाऱ्याला घेऊन शास्त्री नगर रुग्णालय गाठले मात्र रुग्णालयात तज्ञ डॉकटर नसल्याने या रुग्णाला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . डोंबिवलीत राहनाऱ्या एका वयोवृ्द्ध महिलेचा मृत्यू झाला. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास तिचे नातेवाईक तिचा मृतदेह घेऊन पाथर्ली स्मशानभूमीत घेऊन गेले. गॅस शवदाहिनीमध्ये महिलेचा मृतदेह टाकताच भडका उडाला. या भडक्यात कंत्रटी कर्मचारी गोपाळ अडसूळ यांचा चेहरा भाजला. घडलेल्या घटनेमुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली . वृद्ध महिलेच्या नातेवाईकानी  रुग्णवाहिकेसाठी 108 वर कॉल केला. त्यानंतर 100 नंबरवही कॉल केले. मात्र  तासभर उलटूनही  रुग्णवाहिका आलीच नाही अखेर जखमी गोपाल यांना घेऊन शास्त्रीनगर रुग्णलय गाठले. त्याठीकाणी तज्ञ डॉकटर नसल्याने रुग्णालयातून त्यांना कळवा येथे नेण्यास सांगितले .याबाबत वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी  महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले.मात्र अधिकाऱ्यानी देखील हतबलता स्पष्ट केल्याचे ठोके यांनी सांगितले. गोपाळ यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्यसेवेचे मात्र पुरतेच पोलखोल झाली आहे . नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केडीएमसी प्रशासन तज्ञ डॉक्टर कधी नियुक्त करणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे दरम्यान याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल असं सांगितलं