Now Loading

शेतकऱ्यांच्या वीज तोडणी त्वरित थांबवा; अन्यथा तिव्र आंदोलन करू - शिवाजी (दादा) ठोंबरे केज,:बीड जिल्ह्यातील केज तालुक्यासह सह अनेक तालुक्यांत अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना वीज बिलापोटी सरसकट वीजपुरवठा बंद करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. एकीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा तर दुसरीकडे सक्तीची वीज वसुली सुरू करून या हाताने दिलेले त्या हाताने व्याजासकट वसूल करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे, महाराष्ट्र राज्य वीज शेतकऱ्यांच्या वीज तोडणी त्वरित थांबवा; वाया गेल्यामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे काम महावितरण कंपनी करत असून शेतकऱ्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. त्यांच्या आक्रोशाचा विस्फोट होण्याअगोदर सक्तीची वीज बिल वसुली बंद करून शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा तोडलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश तत्परतेने द्यावेत, अन्यथा महावितरणच्या विरोधात छावा मराठा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा खनखनित ईशारा शिवाजी दादा ठोंबरें प्रसिद्धीपत्रकातुन दिला आहे. वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीज तोडणी अभियान त्वरित थांबवावे अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी दिला आहे. खरीप हंगाम