Now Loading

आनंद नगर मेट्रो स्टेशन ला परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणी करता वंचित बहुजन आघाडी तर्फे कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त सचिन तामखेडे यांना निवेदन देण्यात आले

पुणे : आज दि.10.11.2021 रोजी वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील आईडीएल कॉलनी आनंद नगर या मेट्रो स्टेशन ला परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणी करता कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त सचिन तामखेडे, पुणे महा मेट्रोचे व्यवस्थापक गाडगीळ साहेब, पराढ साहेब, पुण्यनगरीचे उपमहापौर सुनीता ताई वाडेकर, महापौर कार्यालयाचे सचिव कांबळे साहेब, पुणे महापालिका आयुक्त कार्यालय इत्यादी वंचित बहुजन आघाडी च्या कोथरुड विधान सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडी कोथरुड उपाध्यक्ष गंगाधर ओव्हाळ, सचिव विशाल सरोदे,भगीरथ नामा वृत्तपत्राचे मुख्य संपादक दिपक सगर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना इमेल द्वारे कळविण्यात आले कोथरुड मधील सर्व आंबेडकरी जनते मधील सदर स्टेशन च्या नाम करणाविषयी मागणी होत असून लवकरात लवकर शासनाने गांभीर्याने याची दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र मोर्चे आंदोलने निरदर्शने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.