Now Loading

क्रिडा शिक्षका मंगला लोखंडे यांना राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्कार अंबाजोगाई :( बीड )येथील गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेतील क्रिडा शिक्षिका मंगला बाबुराव लोखंडे यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्था फुलेपिंपळगांव ता. माजलगांव संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रिडारत्न पुरस्कार माजलगाव येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शिक्षिका मंगला लोखंडे यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा, पर्यावरण, साहित्य आदि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. जेष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.