Now Loading

बीड येथे बामसेफ एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर, केडर कॅम्प संपन्न दिनांक २१नोव्हेंबर २०२१ रोजी क्रांती कोचिंग क्लासेस बीड येथे बामसेफ चे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरांमध्ये बीड बामसेफ जिल्हा युनिट व मूलनिवासी संघ जिल्हा बीड यांच्या वतीने जवळपास 32 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाकरिता उपस्थित होते. या प्रशिक्षणादरम्म्यान बामसेफ चे मराठवाडा अध्यक्ष मा सुर्यवंशी जितेन्द्र सर यांनी बामसेफ हे सामाजिक व्यवस्था परिवर्तन घडवणारे संघटन आहे, वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याचे संदर्भ देत व्यवस्था परिवर्तन करीत आहे सामाजिक जनजागृतीची आवश्यकता,मूलनिवासी बहूजणाच्या गुलामीची कारणे, यावर आधारित मांडणी केली. पुढच्या काळामध्ये मूलनिवासी बहुजन समाज विशिष्ट उद्देशाने प्रेरित होऊन फुले-आंबेडकरी आंदोलन यशस्वी करण्याकरिता समाजातील सर्व घटकापर्यंत संविधानिक हक्क आणि अधिकार पोहोचवणे त्याबद्दल माहिती देऊन भारतीय संविधान,सम्मान, सुरक्षा, संवर्धनाची आवश्यकता या व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष कोकाटे व निसर्गध सर यांच्या संपर्कातून ओबीसी प्रशिक्षणार्थी संख्या अधिक होती. पठाण सर व बीड जिल्ह्यातील बामसेफ चे ज्येष्ठ कार्यकर्ते डोंगरे सर,मूलनिवासी संघ महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष आदरणीय बनसोडे सर, मुळनिवासी बीड जिल्हा अध्यक्ष हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. आदरणीय कैलास वाव्हळकर सर , मुळनिवासी संघ बीड जिल्हा सचिव आदरणीय रविकांत उघडे सर यांच्या प्रयत्नातून मूलनिवासी संघातील इतर कार्यकर्ते पण उपस्थित होते... मुळनिवासी संघ बीड जिल्हा प्रशिक्षण सचिव आदरणीय परमेश्वर नवगिरे यांनी प्रत्येक महिन्याला तालुका पातळीवर असे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.