Now Loading

संकल्प अभियान अंतर्गत100 रूग्ण मुंबई ला रवाना.

परभणी दि 22 नोव्हेंबर; परभणी विधानसभा आ डॉ. राहूल पाटिल यांनी संकल्प अभियान अंतर्गत मतदार संघातील मोतीबिंदू झालेल्या100 गरजू रुग्णांवर मुंबईत जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, आ, पाटिल यांनी यासाठी लागणारा खर्च स्वतः करणार आहेत. त्या100 रुगणांच्या गटाला परभणी येथील रेल्वे स्थानक येथून रात्री नंदीग्राम एक्सप्रेस या गाडीने शनिवारी रात्री8 वाजता रवाना करण्यात आले, यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की यासाठी आपण गेल्या महिन्यात जेष्ठ नेत्र रोग तज्ञ डॉ .तात्या लहाने यांची भेट घेतली होती आणि शिबीर आयोजित करण्याबाबत चर्चा केली होती, यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ, विवेक नावेंदर, स्टेशन प्रमुख अरविंद इंगोले यांची उपस्थिती होती.