Now Loading

सोलापूर : जोडभावी पेठ पोलीस ठाणे ठरले 'नंबर वन' ; शहर व जिल्ह्यातून मारली 'बाजी'

सोलापूर : विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी राज्यातील सर्वोत्तम अकरा पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली. यात सोलापूर पोलिस आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलिस ठाणे 'नंबर वन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्कृष्ट पोलिस ठाणे निवडण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. याआधारे सर्वोकृष्ट ११ पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. यात प्रथम माहिती अहवाल, चोरीस गेलेली आणि बेवारस वाहने, हरवलेले व्यक्ती, अनोळखी मृतदेह, छायाचित्र संग्रह, पोलिस पडताळणी सेवा, नेहमीचे प्रश्न निविदा, विविध परवानांची माहिती, पारपत्र स्थिती, वाहतूक सूचना व कारवायांसह विविध निकषांच्या आधारे सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. या यादीत अमरावती परिक्षेत्रातील बाभूळगाव पोलिस ठाणे (यवतमाळ), औरंगाबाद परिक्षेत्र सेवली पोलिस ठाणे (जालना), कोकण परिक्षेत्र कणकवली पोलिस ठाणे (सिंधुदुर्ग), पोलिस आयुक्त ठाणे शहर महात्मा फुले चौक पोलिस ठाणे, कोकण परिक्षेत्र सावंतवाडी पोलिस ठाणे (सिंधुदुर्ग), पोलिस आयुक्त सोलापूर शहर जोडभावी पोलिस ठाणे, पोलिस आयुक्त ठाणे शहरातील कासार वडवळी पोलिस ठाणे. अमरावती परिक्षेत्र मारेगाव पोलिस ठाणे (यवतमाळ), पोलिस आयुक्त बृहन्मुंबई विनोबा भावेनगर पोलिस ठाणे, नाशिक परिक्षेत्र राजूर पोलिस ठाणे (नगर) यांचा समावेश आहे. उत्कृष्ट पोलीस ठाणे (Best Police Station) निवडण्यासाठी सर्व पोलीस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती सर्व घटक प्रमुखांकडून या कार्यालयास प्राप्त झाली आहे. सर्वाधिक प्राप्त गुणांनुसार सर्वोत्कृष्ट ११ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. खालील घटक प्रमुखांनी आपल्या पोलीस ठाण्यांना भेट देऊन पोलीस ठाण्याला देण्यात आलेल्या गुणांची / आकडेवारीची पडताळणी करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १० दिवसाच्या आत अपर पोलीस महासंचालक (का. व सु.) यांना सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.