Now Loading

विद्युत वितरण कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

अचलपूर - ह्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची सर्व पिके खराब झाली त्यात मुख्य पिक संत्राचे अतोनात नुकसान झाले ह्या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला.. शेतकऱ्यांची दिवाळी हि अंधारातच गेली. शेतकऱ्यांना या पुढे आपली पिके कशी उभी करावी हे सुचेनासे झाले. शेतकरी इकडून तिकडून कसेबसे उधार पाधार पैसे, व्याजाने, सोने गहाण ठेऊन आपले कांदा, गहू, चणा, हि पिके उभी करण्याच्या तयारीत होते. त्यातच नवीन विदयुत वितरण कंपनीची नवीन दंडेलशाही सुरु झाली. त्यांनी शेतकऱ्यांची शेतीतील विज पुरवठा खंडित करायला सुरुवात केली. आधी विद्युत देयक बिल भरा त्यानंतर विज पुरवठा सुरु करणार अशी हुकूम निघाले. नादुरुस्त ट्रान्स्फार्मर विज बिल भरल्याशिवाय सुरु होणार नाही असे सांगण्यात येत आहे.. अश्या परिस्थितीत शेतकरी वर्गाने आपली पिके कशी वाचवायची. यावर्षी अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन.. शेतकऱ्यांना आपले जगणे असाह्य झाले पण या महाविकास आघाडी कडून एक रुपयाची मदत देण्यात आली नाही.. पिक विमा देण्यात आला नाही. असे असतांना आता कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचा जिव घ्यायच्या मागे हे सरकार लागले आहे असे दिसत आहे. सरकार ह्या विषयावर गंभीर होऊन बोलतांना दिसत नाही. विद्युत वितरण कंपनीने हा कृषी विजपंपाचा विज पुरवठा खंडित करणे तात्काळ थांबवले नाहीतर भारतीय जनता पार्टी अचलपूर उग्र आंदोलन करणार आहे.. विशाल म. काकड. भाजपा तालुका अध्यक्ष अचलपूर. सदस्य पंचायत समिती अचलपूर.