Now Loading

आसामच्या गुवाहाटीमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आसाममध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गुवाहाटी होता. दुपारी एकच्या सुमारास हे धक्के जाणवले. आतापर्यंत या भूकंपांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, आज पहाटे पश्चिम राजस्थानमधील जालोर, जोधपूर आणि सिरोही जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. याच्या एक दिवस आधी सिरोहीमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते. 
 

अधिक माहितीसाठी: Times Of India | Zee News