Now Loading

माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहिर

धुळे भारतीय जनता पार्टी तर्फे धुळे नंदुरबार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल यांना उमेदवारी जाहिर झाल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा गृहनिर्माण व श्रेत्रविकास महामंडळ (म्हाडा) नाशिक विभाग माजी उपसभापती बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, धुळे जि. प. अध्यक्ष तुषार रंधे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जि. प. सदस्य प्रा. संजय पाटील, प्रताप सरदार, संजय आसापुरे, आबा धाकड, जितेंद्र सुर्यवंशी, महेंद्र पाटील, रोहित शेटे, रविंद्र भोई, मुबीन शेख, विक्की चौधरी, अनिल बोरसे, अमोल पाटील, रफीक तेली, विजय सुर्यवंशी, मेहुल धाकड, जय पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी धुळे नंदुरबार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल हे प्रचंड बहुमतांनी निवडुन येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.