Now Loading

राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राचार्य भिकाजी पांडुरंग देवरे यांना प्रदान

धुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार डांगुर्णे ता. शिंदखेडा येथील वसंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य भिकाजी पांडुरंग देवरे यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.  शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते ओझर ता. जुन्नर जि. पुणे येथे पार पडलेल्या मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्य अधिवेशनात श्री क्षेत्र विघन्हर देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधान परिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे, मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, राज्य अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. आर. डी. निकम, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ महामंडळ अध्यक्ष विजय बोरसे, एस. बी. सूर्यवंशी, राज्य सदस्य प्राचार्य आर. व्ही. पाटील, उदय तोरवणे, संजीव पाटील, शांताराम कदम, के. व्ही. बाविस्कर, प्रवीण कदम, आर. सी. सोनवणे, सदाशिव भलकार आदी मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते. प्राचार्य देवरे हे गेली २६ वर्षाहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात सक्रिय आहेत. प्राचार्य देवरे हे उपक्रमशील मुख्याध्यापक असून माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध विज्ञान प्रदर्शनात त्यांनी परीक्षक म्हणून आतापर्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी शैक्षणिक हितासाठी विविध शालेयपयोगी उपक्रम राबवून गरीब व होतकरू विद्याथ्र्यांसाठी त्यांनी वेळप्रसंगी पदरमोड करून त्यांना आर्थिक मदतीसाठी हातभार लावला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मदतीच्या, कार्यासह निसर्ग मित्र समितीचे जिल्हा सहसचिव म्हणून वृक्षारोपण कार्यात सतत पुढाकार घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यात यशस्वी हातभार लावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्व. मातोश्री वेडुबाई व वडील पांडुरंग देवरे यांनी त्यांना लहानपणापासूनचं शिक्षणासाह सामाजिक कार्याची गोडी लावली होती. त्यामुळे हा पुरस्कार आई स्व. वेडुबाई व वडील पांडुरंग देवरे यांच्यासह संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. वसंतराव पाटील, स्व. वंदना वसंतराव पाटील, मोठे बंधू हेमराज देवरे, मेहुणे रतन निकम, कृष्णा निकम, सासरे माधवराव सोनवणे आदींना त्यांनी अर्पण केला आहे. दरम्यान, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. एस. देसले, प्राथमिक शिक्षणाधिकारी एम. आर. पवार, डाएट प्राचार्या मंजुषा क्षीरसागर, शिंदखेडा गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, नाशिक आरोग्य विभाग प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे शहर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक यांच्यासह सर्व जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघटना, जिल्हा विज्ञान, गणित अध्यापक संघटना, डांगुर्णे येथील सर्व ग्रामस्थ, मालपूर ता. साक्री येथील सर्व ग्रामस्थ, धुळे जिल्हा निसर्ग मित्र समिती पदाधिकारी आिंदनी कौतुक केले आहे.  प्राचार्य भिकाजी देवरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव्