Now Loading

चार बसेसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या चार जखमी

धुळे हयेथील बस स्थानकातून मार्गस्थ झालेल्या चार बसेसच्या काचा अज्ञातांनी फोडल्याने कर्मचारयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  एसटी कर्मचारयांनी पुकारलेल्या बंदमुळे वाहतुकच ठप्प झाली आहे. वाहतुक सुरु व्हावी यासाठी आजपासून धुळे आगारातून पोलीस बंदोबस्तात  बसेस सोडण्यात आल्या. त्यापैकी ४ बसेसला अज्ञात आरोपी यांनी लक्ष करुन या बसेसच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेत चालक विजय भामरे हे जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. बसची वाहतुक सुरळीत करण्यासाठी कसोसिने प्रयत्न जारी आहेत. असे असतांनाही संबधितांना ही वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी यश येत नाही आहे. आजपासून हया वाहतुकीला काहीशी चालना मिळेल अशीच सर्वांना आशा होती. पंरतु त्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला आहे. हे अज्ञात आरोपी कोण, त्यांनी हे कृत्य का केले, हे मात्र पोलिसांनी या आरोपी यांनी जखडल्यावरच कळणार आहे. ज्या चार बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. हया चारही बसेस धुळे बस स्थानकात आणण्यात आल्या आहेत. एसटी बंद असल्याने नागरीकांना विनाकारण खाजगी वाहनांवर जावे लागत आहे. खाजगी वाहन धारकांकडून ज्यादा भाडे आकारले जात असल्याने नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक गणिते ही कोलमडत आहेत. असे असतांना आता कुठे लालपरी ही रस्त्यावर धावण्यासाठी मार्गस्थ झाली असतांना हया लालपरीला अज्ञातांनी लक्ष करुन लालपरीच्या चाकांना मोगरी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जे कर्मचारी लालपरीवर दाखल झाले आहेत. त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  चार बसेसच्या काचा  फोडल्या; चालक जखमी धुळे ह एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी एस.टी.कामगारांचा संप सुरू आहे. आज एस.टी.महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशिक्षणार्थी कर्मचारयांना बोलावून थेट एस.टी.बस सेवा सुरू केली. या सेवेला महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला. काही काळ तणावही निर्माण झाला होता. पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने धुळे - नरडाणासह धुळे - धनुर गावासाठी बस सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली आहे.  एस.टी.महामंडळाचे शासनाने विलीनीकरण करण्यासाठी गेल्या चौदा दिवसापासून कर्मचारयांचे आंदोलन सुरू आहे. त्यातच प्रवाशांसह टीईटी परिक्षार्थींचे फोन एस.टी.महामंडळाला आल्याने त्यांच्या सुविधेसाठी एस.टी.उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. त्यामुळेच धुळे एस.टी.महामंडळाच्या वतीने धुळे आगारातून दोन बस प्रशिक्षणार्थींच्या मदतीने रस्त्यावर धावल्या. त्यात धुळे- नरडाणा अन् धुळे धनुर या ठिकाणी एस.टी.पाठविण्यात आल्या. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाNयांनी ए.टी.महामंडळाच्या भुमीकेचा तीव्र विरोध केला. एस.टी.महामंडळातून बाहेर काढण्यास मज्जाव केल्याने काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अधिकची कुमक बोलवून हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. एस.टी.महामंडळाने कर्मचारयांवर दबाव टाकु नये, प्रशिक्षणार्थींच्या मदतीने बससेवा सुरू करु नये अशी मागणी केली. परंतु प्रवासी व परीक्षार्थी विद्याथ्र्यांच्या मागणीनुसारच पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली. टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणार्थी कर्मचारयांच्या मदतीने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस बंदोबस्तात बस दोन मार्गांवर रवाना करण्यात आल्या.