Now Loading

ऊस तोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळायला हवे यासाठी प्रत्येक ठिकाणी साखर शाळा असणे गरजेचे ऊस तोड मजूर कुटुंबांची मागणी....

ऊस तोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळायला हवे यासाठी प्रत्येक ठिकाणी साखर शाळा असणे गरजेचे ऊस तोड मजूर कुटुंबांची मागणी....Children of cane-cutting laborers Education should be given Everywhere for this There needs to be a sugar school Of cane breaking labor families Demand .... S NEWS  ऊस तोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळायला हवे यासाठी प्रत्येक ठिकाणी साखर शाळा असणे गरजेचे ऊस तोड मजूर कुटुंबांची मागणी....      प्रत्येक वर्षी उसतोड मजूर आप आपली गावे सोडून लांबवरून उसतोडणीच्या  कामासाठी येत असतात.उन, वारा ,पाऊस  याच्याकडे न पाहता उसतोड मजूर आपल्या मुलांबाळा सोबत उस तोडणी करताना दिसून येत आहेत  भारत सरकारने एक सोय करायला हवी आहे ती म्हणजे  या उसतोड मजूरांच्या मुलांना शिक्षण मिळायला हवे आहे त्यासाठी प्रत्येक साखर कारखाण्याने  उसाला तोड मजूरांच्या टोळी जवळ साखर शाळा सुरू केलेल्या होत्या परंतू आत्ता च्या स्थितीमध्ये साखर शाळाच सुरू केलेल्या नसलेचे चित्र दिसून येते आहे    लाडेगाव, वशी ता. वाळवा येथे  रोडलगत ऊस तोड मजुर आपल्या लहान लहान चिमुकल्या मुलांना घेऊन पाल मारून राहतात व थंडी वाऱ्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत  हे   जीवन जगत असताना या लहान मुलांच्या  शिक्षणाकडे कोण लक्ष देणार या मुलांच्या पुढिल शैक्षणिक गुणवत्तेचा विचार कोण करणार तरी  या दैन्य अवस्थेचा शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.तसेच लहान लेकरे घेऊन हे ऊस तोड मजूर थंडी वाऱ्याचे तमा न बाळगता पोट भरण्यासाठी ही कुटुंबे बिकट जीवन जगत आहेत   या उसतोड तोड मजूर कुटुंबांना शासनाच्या वतीने सर्व सोयी मिळतील अशी व्यवस्था करायला हवी आहे. अशी नियमावली करावी अशी मागणी  उसतोड मजूर करताना दिसून येते आहे...    काही दिवसापासून अवकाळी पाऊस चालू आहे.  त्यामुळे त्यांच्या झोपडीत पावसाचे पाणी गेल्याने ऊसतोड मजुरांचे व महिलांचे तसेच लहान मुलांचे अतोनात हाल होत आहे. ऊसतोड मजुरांच्या दैन्य अवस्थेकडे माणुसकी म्हणून तरी शासनाने लक्ष देणे काळाची गरज आहे...