Now Loading

गंगाखेड येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत अतिवृष्टी अनुदान वाटपास सुरुवात.

परभणी दि22 नोव्हेंबर;सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील48 गावांना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी10 हजार रुपयांची मदत वाटपास गंगाखेड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत आज सुरुवात झाली असल्याची माहिती बँकेचे संचालक भगवान सानप यांनी बोलताना दिली आहे. बँकेकडे कमी मनुष्यबळ असल्याने शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. दि 22 नोव्हेंबर2021 ते 31 डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील48 गावांना मराठी अद्याक्षराप्रमान यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री बाबा यांनी सांगितले आहे.