Now Loading

सोलापूर : वैतागलेल्या एसटी चालकाने एसटी बसच चोरून नेली ; गुन्हा दाखल

सोलापूर : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.राज्य सरकारने विनंती करूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत. सरकार मागणी मान्य करत नसल्याने एसटी कर्मचारी सुद्धा वैतागून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूरात एसटी चालकाने एसटी बस चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरणप्पा मडुअण्णा बेणुरे, रा. विंचूर ता.द.सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. निलेश माणिक कांबळे वय ४२ वर्षे नोकरी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक सोलापूर आगार, यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, एम एच ४० वाय ५०३० ही एस टी बस २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ०२:२६ वा सुमारास एस टी बस स्थानक, सोलापूर येथे डेपोकडे जाणाऱ्या रोडवर विभाग नियंत्रक यांचे बंगल्याच्या बाजुला पार्क केलेली असताना चालक पदावर नोकरीस असणाऱ्या चालक शरणप्पा मडुअण्णा बेणुरे, याने त्याची ड्युटी नसताना, एस टी कर्मचारी संप चालू असल्याने सर्व एस टी बसेस बंद असताना वरीष्ठांच्या संमतीवाचुन मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बरडे हे करीत आहेत.