Now Loading

IND vs NZ: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडचा क्लीन स्वीप, तिसरा T20 सामना 73 धावांनी जिंकला

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारतीय संघाने न्यूझीलंडचा क्लीन स्वीप केला. या सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 7 गडी गमावून 184 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 17.2 षटकांत सर्वबाद 111 धावांत आटोपला. त्याचबरोबर भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला आणि या विजयासह भारतीय संघाने न्यूझीलंडचा क्लीन स्वीप करत आपल्या नावावर नाव कोरले. कर्णधार रोहित शर्माने तीनही वेळा नाणेफेक जिंकून तीनही सामने जिंकले. त्याचबरोबर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 25 नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.
 

अधिक माहितीसाठी - India.Com