Now Loading

भिगवण पोलीसांनी अट्टल दरोडेखोरांचा दरोडयाचा प्रयत्न लावला अधळुन,टोळी केली जेरबंद, टोळीकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व इतर साधने केली जप्त

भिगवण:-इंदापूर तालुक्यातील भिगवण हद्दीतील एका पेट्रोल पंपावर चार ते पाच दरोडेखोर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. टोळीकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व इतर साधने जप्त हस्तगत करण्यात आली आहेत. १) संदिप आनंद हीरगुडे(वय ३४ वर्षे रा. हारनस, ता.भोर, जि. पुणे ,२)अनिकेत विलास सुकाळे(वय२३वर्षे, रा.मुळ रा. कांबरे ता. भोर जि.पुणे सध्या रा.मारूती मंदिराजवळ,रायकरमळा, धायरी,पुणे) ३) रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार(वय.३३ वर्षे रा.वाकम्बे ता.भोर, जि.पुणे सध्या रा.मारूती मंदिराजवळ, रायकरमळा,धायरी,पुणे) ४) शंभुराज मच्छिंद्र जेधे(रा.आंबवडे ता. भोर जि.पुणे, ५) पुनित (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सदर घटनेची हकीकत अशी की (दि.२२ रोजी) भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस. निरीक्षक, दिलीप पवार यांना मौजे भिगवण ता.इंदापुर जि.पुणे गावचे हददीत सागर हॉटेल जवळ असलेल्या सोनाज H.P पेट्रोल पंपावर ४ ते ५ दरोडेखोर सशस्त्र दरोडा घालणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलिस स्टाफ मदतीस घेऊन सदर ठिकाणी सापळा रचुन वरील आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडुन एक गावठी पिस्टल,पाच जिवंत काडतुस,एक लोखंडी कटावणी,एक चाकु,एक मिरचीची पुड व एक मोटार सायकल (नंबर एम.एच.१२/के.एक्स.६४१९) असा एकुण १,०५,२००/- रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम.३९९,४०२, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरील आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु आहे. सदरची कामगिरी डॉ.अभिनव देशमुख,पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण,मिलींद मोहीते,अपर पोलीस अधीक्षक,बारामती विभाग,पुणे ग्रामीण,गणेश इंगळे,उपविभागीय पोलीस अधीकारी,बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहा.पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,रूपेश कदम,पोलीस अंमलदार इन्कलाब पठाण,समीर करे,आप्पा भंडलकर,रामदास जाधव,सचिन पवार,अंकुश माने,शंकर निंबाळकर,सुभाष गडदे,पोलीस मित्र रवी काळे,विकास गुनवरे, अशोक चोळके,यांनी केली आहे.