Now Loading

सोलापूर : शहर युवक डोंगरे तर जिल्ह्यात पवार 'फायनल', विजापुरेंनी साधला 'मध्य', लोंढेला उत्तर ! प्रदेश व दक्षिणसाठी आमदार ताईंची राजकिय 'गुगली'

सोलापूर : काँग्रेस पक्षांमधील युवक काँग्रेसच्या महायुद्धाला सुरुवात झाली आहे ही निवडणूक राज्यस्तरावरील असल्याने त्याकडे संपूर्ण काँग्रेसच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. सोलापुरात आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणितीताई शिंदे या सांगतील ती पूर्व दिशा असे कार्यकर्त्यांनी ठरवले होते. 12 नोव्हेंबर पासून मतदानाला सुरुवात झाली होती या निवडणुकीत काँग्रेसचे युवा कार्यकर्ते मतदान करत आहेत. सोलापुरात शहरासह सर्व विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस या पदांसाठी मोठी चुरस आहे. 20 नोव्हेंबर रोजी आमदार प्रणितीताई शिंदे या अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली होती, त्या पार्श्वभूमीवर 22 नोव्हेंबर सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवनात सर्व इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर शहर युवक अध्यक्षपदासाठी गणेश डोंगरे यांना फायनल करण्यात आले आहे जिल्हाध्यक्षपदासाठी पंढरपूरचे सुनंजय पवार यांना मतदान करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. आमदार ताईच्या शहर मध्य मतदार संघासाठी वाहिद विजापुरे यांना फायनल करण्यात आले. श्रीकांत वाडेकर याला महापालिकेची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहर उत्तर साठी महेश लोंढे आणि शरद गुमटे यांच्यात स्पर्धा होती मात्र शरद गोमटे याला एनएसयुआय संघटनेत संधी देण्याचे आश्‍वासन मिळाल्याने महेश लोंढे यांचा मार्ग मोकळा झाला. दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद व प्रदेश सरचिटणीस पदावर प्रणिती शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तो गुलदस्त्यात ठेवलाय. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाल राऊत व शरण पाटील यांना सपोर्ट करण्याच्या सूचना केल्या. राज्यात प्रदेश युवक मध्ये सध्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत व सत्यजित तांबे यांच्यात गट आहेत, त्यातच प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील हे सुध्दा युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत. प्रदेश सरचिटणीस पदासाठी मनोज कुलकर्णी, सुमित भोसले ,प्रवीण जाधव, ओंकार गायकवाड ही युवा मंडळी उमेदवार आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघावर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचं लक्ष असल्याने ते युवकअध्यक्ष पद आमदार ताईंनी गुलदस्त्यात ठेवल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक इच्छुक असलेला अर्जुन साळवे याची संधी गेल्याने त्याचा हिरमोड झाला.