Now Loading

विधानपरीषदेवर दिवंगत नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाल्याने काॅग्रेस कार्यक्रत्यांनी हिंगोली जिल्ह्याभरात जल्लोष साजरा केलाय... काॅग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचं अकाली निधनानंतर त्यांच्या रीक्तजागेवर दिवंगत नेते स्वर्गीय राजीव सातव खासदार यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर उमेदवारी मिळावी अशी मागणी होत होती, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत रीक्त झालेल्या जागेसाठी डॉ प्रज्ञा सातव यांना काॅग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती.या एक जागेसाठी काॅग्रेस कडुन डॉ प्रज्ञा सातव तर भाजपा कडुन संजय केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.दिवगंत नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांची पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवड करण्यासाठी काॅग्रेसच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ईतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्या अनुषंगाने भाजपा चे उमेदवार केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यामुळे डॉ प्रज्ञा सातव यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली असुन त्यांच्या या निवडीबद्दल हिंगोली जिल्ह्यात काॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्साह साजरा केला दिवंगत नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर उमेदवारी मिळाल्याने काॅग्रेसचे बळ वाढणार आणि येणाऱ्या निवडणुकीत काॅग्रेस पक्ष हिंगोली जिल्ह्यावर विराजमान होणार असे बोलले जात आहे.