Now Loading

हिंगोलीत जवानांची गाडी खड्ड्यात आदळुन बंदुकीतुन अचानक गोळी सुटून जवानाचा मृत्यू राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे देशाने जवान गमावला हिंगोली :आखाडा बाळापूर येलकी ता. कळमनुरी येथील सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाचा अपघातात छातीत गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. २२ राेजी सकाळी घडली. त्यांच्या फोर्सच्या डॉक्टरला आणण्यासाठी नांदेड ला जात असताना हिंगोली-- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डय़ामध्ये गाडी आदळल्याने रायफलमधून अचानक गोळी झाडल्या गेली. ती गोळी थेट छातीत लागल्याने जवान पप्पाला भानुप्रसाद यांचा मृत्यू झाला . याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सेवा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानुप्रसाद ( वय ३५ वर्षे) रा. आंध्रप्रदेश हे कर्तव्यावर होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते दलाच्या गाडीमध्ये हैदराबादवरून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी जात होते .दरम्यान हिंगोली ते नांदेड या रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. डोंगरकडा पासून तीन किलोमीटरवर गाडी आली असता रस्त्यावरील एका खड्ड्यात गाडी आदळली. यावेळी जवान पप्पाला भानुप्रसाद यांच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली. ती थेट जवानाच्या छातीत घुसल्याने जवान पप्पाला गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असले तरी खड्डे तात्पुरते बुजावण्याची आवश्यकता होती. परंतु संबंधिताच्या बेजावबदारपणामुळे एका जवानाला प्राणास मुकावे लागले आहे. यामुळे सतंप्त नागरिकांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.