Now Loading

US: विस्कॉन्सिनमध्ये Christmas परेडमध्ये वेगवान SUV घुसली, 5 ठार, 40 हून अधिक जखमी

अमेरिकेच्या ईशान्येकडील विस्कॉन्सिन राज्यात रविवारी दुपारी ख्रिसमस परेडदरम्यान मोठा अपघात झाला. रविवारी वाउकेशा, विस्कॉन्सिन येथे गर्दीच्या परेडमध्ये SUV ने धडक दिली, ज्यात 40 हून अधिक लोक जखमी झाले आणि किमान पाच जण ठार झाले, असे स्थानिक पोलिस प्रमुखांनी सांगितले. मात्र, ही दहशतवादी घटना असण्याची शक्यता पोलिसांनी अद्याप फेटाळून लावलेली नाही. वाउकेशाचे पोलिस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी सांगितले की, संशयिताचे वाहन जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील संशयिताची ओळख पटवली आहे. पोलिसांनी सांगितले की, काही जखमींना रुग्णवाहिकेने, काहींना पोलिसांनी तर काहींना कुटुंबीय आणि मित्रांनी रुग्णालयात नेले. या घटनेच्या ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लाल रंगाची एसयूव्ही परेडमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.
 

अधिक माहितीसाठी: BBC News | CNN | The Times Of India