Now Loading

बीड (केज): साधारण परिस्थितीत शिक्षण घेवून घर, संसार, मुले संभाळून अध्यापनाचे धडे देणाऱ्या महिला शिक्षिका धम्मदिपा दरबारे यांच्या उत्कृष्ट कार्याची वरिष्ठांनी दखल घेवून केज तालुक्यातील सांगवी (सारणी) या केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी नुकतीच निवड केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील येवता जिल्हा परिषद माध्यमिक शाळेवर श्री. अंबादास नानाभाऊ काळे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी श्रीमती धम्मदिपा नरसिंगराव दरबारे (काळे) या पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या पती पत्नी शिक्षक जोडीचे येवता हे गाव असल्याने विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ देवून उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावचा प्रत्येक विद्यार्थी हा देशात चमकला पाहिजे. या ऊद्देशाने आपले कर्तव्य बजावत आहेत. या त्यांच्या कार्याची शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठांनी दखल घेवुन येवता येथील शिक्षक अंबादास काळे यांच्या पत्नी व सहकारी श्रीमती धम्मदिपा दरबारे यांची जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार आणि शिक्षणाधिकारी (प्रा) मा. श्रीकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 नोहेंबर 2021 गुरूवार रोजी झालेल्या बैठकीत श्रीमती धम्मदिपा दरबारे यांची केज तालुक्यातील सांगवी (सारणी) या केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी निवड करण्यात आली. सध्या त्या पिंपळगाव येथील शाळेत श्रीम. धम्मदिपा नरसिंगराव दरबारे केंद्रप्रमुख सांगवी (सारणी) ता.केज जि.बीड. प्रा.प. या पदावर कार्यरत असुन त्यांचे ऊच्चशिक्षण बी.एस.सी., एम.ए.बि.एड. नवोदय विद्यालय, नांदेड आणि मध्यप्रदेश येथे झाले आहे. तर त्यांची शिक्षिका म्हणून प्रथम नियुक्ती माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील कै.प्रा.शाळेवर दि. 14 डिसेंबर 2001 रोजी झाली होती. त्यांना त्यांच्या आदर्श कार्याबद्दल कासट्राईब संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले या आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सद्या केज तालुक्यातील एकमेव महिला म्हणून श्रीमती दरबारे धम्मदीपा नरसिंगराव यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याने मा. गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक आईवडीलांनी मुलीचा तिरस्कार न करता तिला शिकवुन घडवले पाहिजे. ती देशाचे ऊज्जवल भविष्य आहे. तिच्यामुळे अनेक नाती तयार होतात. तिला जन्माला घालून तिचे स्वागत करा. पिढ्यानपिढ्याचा स्त्रिचा इतिहास आहे. तिला गगनभरारी घेण्यासाठी ऊभारी द्या. सांगवी (सा) केंद्राच्या केंद्रप्रमुख म्हणून धम्मदिपा दरबारे यांची निवड