Now Loading

'या' कंपनीपासून सावधान राहा! महिलांना जाळ्यात ओढून सगळे पैसे केले लंपास, आणि आता कंपनीच गायब

धुळे : पतीपासून लपून घर संसारासाठी तोडकी मोडकी बचत करणाऱ्या शेकडो महिलांना धुळ्यात एका ठग कंपनीने चुना लावला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एकट्या धुळ्यात नव्हे तर औरंगाबाद मधेही महिलांना ठगल्या गेल्या आहेत. बहुतांश महिलांनी मोलमजुरी करून जमवलेला पैसे या कंपनीत गुंतवला ५१ हजारांचे ११ लाख मिळCतील असे या महिलांना सांगितले गेले होते. मात्र, ११ लाख तर मिळालेच नाही सोबत जे पैसे गुंतवले होते तेही बुडाले. काय आहे हा नेमका प्रकार पाहू या? ई फॉर यु नावाच्या कंपनीने धुळे जिल्ह्यात एजंट नेमून गुंतवणूक योजना बाजारात आणली. या कंपनीने गुंतवणूकदारांना लक्ष न करता गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना लक्ष केले. या कंपनीचे एजंट महिलांना गाठायचे त्यांना १५ स्तरीय गुंतवणूक योजना समजावयाचे आणि १५ व्या स्तरावर ५१ हजारांचे गुंतवणूक केल्यावर ११ लाख मिळतील असे आमिष दाखवायचे. भोळ्या बाभळया महिला आर्थिक लाभाच्या लालसेत भासल्या. सुरुवातीला १ हजार रुपये गुंतवलं कि ८५ रुपये बँक खात्यावर जमा होत असल्याने महिलांचा गुंतवणूक प्रतिसाद वाढला. हळूहळू नवऱ्यापासून लपवून महिला गुंतवणूक करू लागल्या. सहा महिन्यानंतर या कंपनीने पोबारा केला. ऑनलाईन उपलब्ध सर्व माहिती जाळातून हटविण्यात आली आणि महिलांना आपली चूक लक्षात आली. ई फॉर यु या कंपनीने तब्बल ३६ लाखांपेक्षा अधिकच गंडा गोर गरीब महिलांना घातला आहे. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. या ठगांनी औरंगाबाद शहरातही महिलांची अशीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महिलांनी ही गुंतवणूक पतींना अंधारात ठेवून केल्याने त्यांना पोलिसात तक्रार केली तर गृहकलह वाढण्याची भीती असल्याने बहुतांश महिला समोर येत नाहीत. असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. या ठगांनी औरंगाबाद शहरातही महिलांची अशीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महिलांनी ही गुंतवणूक पतींना अंधारात ठेवून केल्याने त्यांना पोलिसात तक्रार केली तर गृहकलह वाढण्याची भीती असल्याने बहुतांश महिला समोर येत नाहीत