Now Loading

शेतकऱ्यानी विरोध केला तेव्हाच विधेयक रद्द केले असते तर शेतकऱ्यांचे बळी गेले नसते : भाई मोहन गुंड बीड केंद्र सरकारने अवास्तव शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे आहेत म्हणून बहुमताच्या बळावर तीन विधेयक पारित केले मात्र आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे आज तीन कृषी कायदे मगे घेतल्याची घोषणा ही देशाच्या पंतप्रधानांनी केली आहे, जेव्हा शेतकऱ्यांनी कृष कायदे आमच्या हिताचे नाहीत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली शेतकरी पेटून उठला जगातील सर्वात प्रभावशाली दीर्घकाळ चालणारे आंदोलन म्हणून दिल्लीतील शेतक-याच्या आंदोलनाची ओळख जगभर आहे, शेतकर्याच्या विजय याचा आनंद होतो तर दुसरीकडे एक हजार शेतकरी भावाना जीव गमवावा लागला याचं दुःख आहे, चांदोली जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे ज्या वेळी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली होती त्याच वेळी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचे बळी गेले नसते हे केंद्र सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, केंद्र सरकारने कृषी कायदे माघार घेतले म्हणजे शेतकऱ्यावर उपकार केले नाहीत तर डाव्या पक्षाच्या शेतकऱ्याच्या एकजुटीच्या रेट्यापुढे हात टेकले हे शेतकर्यांच्या एक जुटीचा विजय असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,