Now Loading

मुस्लिम समाज्याच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न

बारामती :- मुस्लिम समाजाच्या संविधानिक हक्क अधिकारां साठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या ५% आरक्षणाची तात्काळअंमलबजावणी करण्यात यावी,वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे तसेच इतर सर्व मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात यासाठी बारामती तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या सहा मागण्या तसेच मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डच्या जमीनीवरती अनधिकृत रित्या कब्जा करण्यात आलेला आहे,हा कब्जा उठवून या जमिनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा. आदी मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले. दरम्यान मुस्लिम समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, तालुकाध्यक्ष रोहित पिल्ले, शहराचे अक्षय शेलार यांच्यासह तालुका महासचिव विक्रम थोरात, मयूर कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रोहित भोसले, अण्णा घोडके, अखिल बागवान, अफसर बागवान, ऍड तुषार ओहळ, मोहन कांबळे, विनय दामोदरे, प्रशांत सरतापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.