Now Loading

मोहम्मद बिन साईद बिन खालेद यांच्यावर एम पी डी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, आ. दुरराणी .

पाथरी दि 22 नोव्हेंबर; मोहम्मद बिन सईद बिन खालेद आणी त्यांचे पुत्र यांच्यावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन नांदेड पोलीस विशेष महानिरीक्षक निसार तांबोळी यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद आ, बाबाजानी दुरराणी यांनी सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की मोहम्मद बिन सईद बिन खालेद या व्यक्ती वर आणि त्याच्या मुलावर पाथरी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तरी त्या व्यक्तीला जिल्हयातून हद्दपार करण्यात यावे. यावेळी दुरराणी यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.