Now Loading

जिल्ह्यात लसीकरण सक्तीची अंमलबजावणी बीड : जिल्हा प्रशासनाला सक्तीने लसीकरण करता येणार नाही, याबाबत विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे खुद्द राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सक्ती करता येणार नाही, स्पष्ट केलेले असताना बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मात्र जिल्ह्यात नागरिकांना विविध ठिकाणच्या प्रवेशापासून ते अक्षरशः राशनसाठी देखील लसीची सक्ती केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला 'जगायचं असेल तर गुपचूप लस घ्या', असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सर्व आस्थापनांमध्ये सक्तीने लसीकरणाचे आदेश रविवारपासून लागू केले आहेत. दरम्यान, याअनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनाकडून आदेशांची कठोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे.