Now Loading

औषध दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात

बारामती शहरातील औषध दुकानाचे शटर उचकून चोरी करणार आरोपीस बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आकाश विठ्ठल पाटोळे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे 19 गुन्हे दाखल आहेत. बारामती शहरातील मोतीबाग येथील पाटील मेडिकलचे शटर उचकून सदर आरोपी चोरी करत असताना नागरिकांनी त्यास पकडून पोलीस स्टेशनला कळविले. बारामती शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता सदर आरोपी भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना खाली पडून जखमी झाला होता. त्यास पोलिसांनी महिला हॉस्पिटल बारामती येथे उपचार कामे दाखल केले. व सदर जखमीस अधिक चौकशी केली असता त्याने पाटील मेडिकल मोतीबाग बारामती येथे चोरी करण्यात आल्याची कबुली दिली. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे 19 गुन्हे दाखल आहेत. सदर रोख 2,100 /- रुपये तसेच पुणे शहरातून चोरी केलेली एक पांढरे रंगाची स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अरुण रासकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीम,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील,युवराज घोडके,सहा.फौजदार अरुण रासकर,संजय जगदाळे,पोना.कोळेकर,पोकॉ.तुषार चव्हाण,बंडू कोठे,मनोज पवार यांनी केली.