Now Loading

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार संजय सावकारे भुसावळ विकास सोसायटी मतदार संघातून विजयी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भुसावळ चे आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ विकास सोसायटी मतदार संघातून विजय मिळवला आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा बँक निवडणुकीचे मतमोजणी झाली यात भुसावळ विकास सोसायटी मतदार संघातून आमदार संजय सावकारे यांनी 26 पैकी 24 मते घेवून विजय मिळवला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विकास सोसायटी मतदार संघातून आमदार संजय सावकारे यांनी उमेदवारी दाखल केली होती. दरम्यान भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता मात्र संजय सावकारे यांनी भुसावळ विकास सोसायटी मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती दरम्यान महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे शांताराम धनगर यांचा पराभव करत संजय सावकारे यांनी विजय मिळवला आहे. शांताराम धनगर यांना अवघे दोन मत मिळाली आहे.