Now Loading

डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या निवडीबद्दल आ. वरपूडकर केला आनंद व्यक्त.

परभणी दि 22 नोव्हेंबर; हिंगोली लोकसभा दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची आज महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे, याबद्दल पाथरी विधानसभा आ, सुरेश वरपूडकर यांनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला असून त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की कै राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठं भरभरून योगदान दिले आहे, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी पक्षासाठी काही तरी करून दाखवतील अशी अपेक्षा आपण ठेवु अस वरपूडकर यांनी बोलताना सांगितले.