Now Loading

कल्याणात भाजप महाविकास आघडी सरकार विरोधात निषेध मोर्चा स्पॉन्सर दंगल कशी घडवावी हे अमरावती मध्ये महाविकास आघाडी ने सिद्ध करून दाखवलं - भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी ,महिला अत्याचार ,शेतकऱ्यांवर कामगारांवर  होणारा अन्याय ,भ्रष्टाचार ,अमरावती  दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता .या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण ,माजी आमदार नरेन्द्र पवार यांच्यांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकरी सहभागी झाले होते .या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली .यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघडीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय ,स्पॉन्सर दंगल कशी घडवावी हे अमरावती मध्ये महाविकास आघाडी ने सिद्ध करून दाखवलं आहे , इतर राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले मात्र महाराष्ट्रमध्ये अद्याप दर कमी झाले नाही ,वीज बिल माफी नाही ,सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचं कोनंतच काम केलं जातं नाही असा आरोप केला