Now Loading

रुपेश भोईर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे यंदाचा जीवन गौरव पुरस्कार युवा समाजसेवक आणि मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांना प्रदान करण्यात आला आहे. रविवारी पालघर जिल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे राज्य स्तरीय समाजरत्न, समाज भूषण आणि जीवन गौरव पुरस्कार दर वर्षी दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार सोहळा पालघर जिल्हातील शिरसाट याठिकाणी संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुपेश भोईर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.