Now Loading

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महिलांसाठी स्व संरक्षण

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून अभाविप कल्याणकडून 'मिशन साहसी' या गतिविधी अंतर्गत 'स्त्री उमंग' हा कार्यक्रम ज्यामध्ये विद्यार्थिनी व महिलांसाठी स्व संरक्षण प्रशिक्षण व खुला संवाद असे सत्र घेण्यात आले. स्व संरक्षण प्रशिक्षक नुपूर घोलप, कल्याण शहर मंत्री अमोल शिंदे व कल्याण शहर एसएफएस प्रमुख स्नेहा शिर्के यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे पहिले सत्र 'स्व संरक्षण' हे नुपूर घोलप व दुसरे सत्र 'खुला संवाद' एड. अर्चना सबनीस यांनी घेतले. दोन्हीही सत्रांना विद्यार्थीनी व महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद आला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.