Now Loading

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला धक्का .... भाजपचे तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील ,माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, सायली विचारे शिवसेनेत  प्रवेश

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजप धक्का दिला आहे .भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील ,डॉ.सुनीता पाटील,सायली विचारे हे तिघाणी  शिवसेनेत प्रवेश  नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी   शिवसेनेत प्रवेश केला  .निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी धक्का असल्याचं बोललं जात असून भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे .गेल्या काही दिवसांपासून केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला आंदोलनांच्या माध्यमातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात होता .मात्र शिवसेनेने भाजपचे नगरसेवक गळाला लावत भाजपलाच कोंडीत पकडलं आहे